
स्थैर्य, सातारा, दि. 7 नोव्हेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासाचा अधिकृत आरंभ भीमाई भूमीतून अर्थात सातारा येथून झाला. सातारा येथे 7 नोव्हेंबर 1900 रोजी त्यांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. या दिनाचे औचित्य व महत्व विचारात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती जागवण्याच्या उद्देशाने छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये विद्यार्थी दिवस सोहळा शुक्रवार, दि. 7रोजी होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या शाळा प्रवेश दिनाला 125 वर्षे होत आहेत. या सोहळ्यासाठी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मुख्याध्यापक सन्मती देशमाने, अमोल भोसले यांच्यासहन्याय जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे, सामाजिक विभागाचे अधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, समता सैनिक दलाच्यावतीने सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांच्या हस्ते व अरुणभाऊ पोळ यांच्या उपस्थितीत अभिवादन केले जाईल. त्यानंतर प्रतापसिह हायस्कूलमध्ये 11 वाजता शाळेला मानवंदना कार्यक्रम होईल.त्यानंतर मुख्य विद्यार्थी दिवस सोहळ्यात कार्यकर्ते व समता सैनिक दल सहभागी होईल. जिल्ह्यातील तमाम आंबेडकर अनुयांयांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अरुण जावळे यांनी केले आहे.

