स्थैर्य, सातारा, दि.१२: शेंद्रे ता. सातारा येथील विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभयसिंहराजे भोसले तंत्रनिकेतन, छ. शाहू आय.टी.आय., छ. शाहू सायन्स व कॉमर्स ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग खाटीक आयुक्त समाजकल्याण विभाग सातारा यांच्या मार्गदर्शनानुसार विध्यार्थी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच मान्यवरांना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तक आणि पेन भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. यु. धुमाळ होते. यावेळी उपप्राचार्य नलावडे, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ. निकम, आयटीआय चे प्राचार्य मोहिते, जुनियर कॉलेजचे प्राचार्य कुलकर्णी आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आदी सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात आला. सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या सूचनांप्रमाणे भारतीय राज्य घटनेच्या सारनाम्याचे जाहीर वाचन करण्यात आले.