जागा निश्चित झाल्यावर एसटीची पार्सल सेवा पुन्हा सुरू


स्थैर्य, 25 फेब्रुवारी, सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकातील एसटीची पार्सल सेवा सध्या बंद असल्याने, अनेकांची गैरसोय होत आहे. एसटी बसस्थानकोचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याने, ही सेवा बंद आहे. जागा निश्चित होताच पार्सल सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी दिली.

एसटी पार्सल सेवेमुळे अनेकांना सामान पाठवणे सोपे होते. ही सेवा अनेक वर्षांपासून अविरत सुरू होती. मात्र, काही दिवसांपासून ही सेवा बंद असल्याने अनेकांचीगैरसोय होत आहे. नूतनीकरणासाठी बसस्थानकाची इमारत पाडण्यात येणार आहे. तेथील सर्व विभाग स्थलातंरित होणार आहे. पार्सल सेवेसाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. सेव्हन स्टॉर मॉल किंवा एसटीच्या प्रशासकीय इमारतीलगतची जागा निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व विभागांबरोबर पार्सल सेवाही सुरू होणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!