दैनिक स्थैर्य । दि.१४ फेब्रुवारी २०२१ । फलटण । महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलटण येथील नगरपरिषदेच्या समोरील सध्या असलेला ऐतिहासिक पुतळा काढून त्या जागी दुसरा पुतळा बसवणार असल्याच्या चर्चा सध्या शहरात सुरू आहेत. तरी सदरील पुतळा काढून नवीन पुतळा बसवण्यास तीव्र विरोध असुन शहरात इतरत्र कोणत्याही ठीकाणी दुसरा पुतळा बसवण्यात यावा.
सध्या असलेला पुतळा ऐतिहासिक आणि चांगल्या अवस्थेतील पुतळा काढून त्या ठिकाणी दुसरा पुतळा बसविणे हे सर्वसामान्य नागरिकांना मान्य नाही.
सदरील एतिहासिक पुतळ्याला प्र. के.अत्रे यांच्या सारख्या मोठ्या साहित्यकाचे हात लागले आहेत. या सोबतच बऱ्याचश्या आंदोलनाची साक्ष सदरील पुतळा आहे.
समाजातील विविध घटकांच्या भावना या पुतळ्याशी जोडलेल्या आहेत. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक पुतळा तसाच ठेवावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या बहुसंख्य फलटणकरांच्या तीव्र भावना विचारात घेतल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्याच जागी ठेवावा. जर दुसरा नवीन पुतळा बसवायचाच असेल तर तो, फलटण मधेच अन्य चौकात योग्य त्या ठिकाणी बसवण्यात यावा.