मल्हारराव होळकर यांच्या भव्य स्मारकासाठी प्रयत्नशील : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । फलटण । सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे जन्मस्थळ मुरुम ता. फलटण येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील स्मारकाच्या धर्तीवर हे स्मारक उभारण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न असल्याचे सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

सुभेदार श्रीमंत मल्हाराव होळकर यांच्या ३२९ व्या जयंती निमित्त मुरुम, ता. फलटण येथे सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती, अखिल महाराष्ट्र धनगर विकास संस्था, जयंती महोत्सव समिती आणि ग्रामपंचायत मुरुम यांच्या संयुक्त सहभागाने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, पंचायत समिती माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत भूषणसिंह होळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, श्रीराम सहकारी साखर कारखाना व्हा. चेअरमन नितीन शाहुराज भोसले, सुनील तात्या भगत, माजी उपसभापती सौ. रेखाताई खरात, पांडुरंग कचरे, गट शिक्षणाधिकारी श्रीमती पठाण, सागर कांबळे, संपतराव देवकाते, मुरुमच्या सरपंच सौ. प्रियंका योगेश बोंद्रे, उपसरपंच संतोष उत्तम बोंद्रे, ग्रामसेवक धायगुडे, महादेव संकपाळ यांच्यासह मुरुम व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या पराक्रमाविषयी माहिती देत त्यांना कोणत्याही लढाईत अपयश आले नाही, अटकेपार झेंडा लावणाऱ्या या योध्याने सतत विजयश्री खेचून आणल्याचे निदर्शनास आणून दिले.
प्रारंभी सुभेदार श्रीमंत मल्हाराव होळकर यांच्या पालखीची गावांतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते प्रतिमेचे व ध्वजाचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. नव्याने उभारण्यात येणार असलेल्या सभा मंडपाचे भूमीपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. अनेक मान्यवरांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवव्याख्याते अमोल खेसे देशमुख यांचे व्याख्यान झाले.

माजी सभापती शंकरराव माडकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात श्रीमंत सुभेदार मल्हाराव होळकर यांच्या ३२९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाविषयी माहिती दिल्यानंतर स्मारकासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. प्रा. रविंद्र टिळेकर यांनी सूत्रसंचालन, समारोप व आभार प्रदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!