स्थैर्य, वाई, दि. १९ : करोनाचा वाढत चालेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशाची वाई शहरात कडक टाळे बंदी करण्यात आली आहे. वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी नेटके नियोजन केले आहे. सर्व रस्ते सुनेसुने दिसत होते. नागरिकांनी घरात रहावे बाहेर पडू नका असे आवाहन करणारी पालिकेची रिक्षा प्रबोधन करत फिरत होती. रात्री उशिरा आलेल्या अहवालात वाईकराना धक्का बसला असून शहरातील एकाच कुटूंबातीले 7 जण बाधित तर तालुक्यातील एकूण 19 जण बाधित झाले आहेत.
वाई शहरात दुसऱ्यांदा लॉकडाऊन सुरू केले आहे. या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून शहरात पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवेच्याच नागरिकांना इंधन ठरलेल्या वेळेत दिले जाते. शहरात कोणीही बाहेर फिरू नये, यासाठी वाई पालिकेच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे. शहरातील सोनगीरवाडी, सिद्धनाथवाडी, ब्राम्हणशाही, धोम कॉलनी यापैकी बहुतेक परिसर हा अगोदरच कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आला आहे. टाळे बंदीत सर्व भाग आता पुन्हा कडक बंद पाळण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसतं होते.