स्थैर्य, सातारा, दि. ०३ : कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र झटत आहे. तरीही सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आणखी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करणार असल्याचे संकेत पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी दिले असून याबाबतची नियमावली सायंकाळपर्यंत जाहीर होणार असल्याचेही ना. पाटील यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी रोजच वाढत असून सध्या दररोज दोन ते अडीच हजार रुग्णांची भर पडत आहे. सर्व उपाय योजना करूनही पॉझिटिव्हीटी रेट कमी होत नाही. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी सातारा येथील विश्रामगृहावर सर्व लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, पोलीस अधीक्षक यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कोरेना संसर्गाचा वाढता प्रभाव करण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची प्रक्रिया आणखी कडक करण्यात येणार आहे. त्याबाबतची नियमावली सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पालीकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.