
स्थैर्य, फलटण : डॉ . बाबासाहेब आंबेडकरयांनी ज्या राजगृहात संविधान लिहिले त्या निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आरपीआयचे (आंबेडकर गट) तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
सदर निवेदनामध्ये मुंबई येथील दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे निवासस्थान आहे. या ठिकाणी अज्ञात भामट्यांनी तोडफोड केली. वास्तविक राजगृह हे तमाम उभ्या महाराष्ट्राचे प्रेरणा स्थान आहे. सदरचा भ्याड हल्ला म्हणजे आंबेडकरी विचारांवर हल्ला आहे. सदर घटनेने संपूर्ण बौद्ध बांधव व दलित समाजात संतापाची लाट उसळली आहे. या आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.