दैनिक स्थैर्य | दि. ०२ नोव्हेंबर २०२१ | सातारा | येथे सदर बझार येथील हनुमान मंदिर याठिकाणी काही समाजकंटकांनी हनुमान मूर्तीवर बुक्का आणि अगरबत्तीची राख टाकून, शिवमंदिरातील त्रिशूल उलटा लावून मूर्तीची विटंबना करण्यात आली, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
ही घटना घडल्यानंतर भारतीय जनता पार्टी व हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व त्यांचे सहकारी यांनी त्या ठिकाणी जाऊन दुग्धाभिषेक करून मूर्तीचे शुद्धीकरण केले व महाआरती करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला, त्यामुळे प्रशासनाने चोर सोडून संन्यासाला फासावर लटकवण्याचा जो प्रकार चालवला आहे, त्याचाही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निषेध केला.
दोषींना कडक शासन करावे व विक्रम पावसकर व त्यांच्या सहकार्यावर दाखल केलेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी, तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहर सरचिटणीस प्रविण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, डॉ. उत्कर्ष रेपाळ, विकास बनकर, आप्पा कदम, डॉ. सचिन साळुंखे, विजय गाढवे, रा.स्व. संघाचे मुकुंद आफळे, श्रीधर कुलकर्णी, महेश शिवदे, गणेश मेळवणे, विक्रम जगदाळे, बजरंग दल जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवी कोठावळे, सनातन संस्थेचे सोनावणे, वनिता पवार, अश्विनी हुबळीकर, तानाजी भणगे, संतोष प्रभुणे, प्रशांत जोशी, विक्रम बोराटे, चंदन घोडके, कृणाल मोरे व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.