
दैनिक स्थैर्य । दि. ०८ मार्च २०२२ । बारामती । वन विभागाच्या हद्दी मध्ये प्रवेश करून धूम्रपान मद्यपान करून आग लावण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे पर्यावरण ऱ्हास होऊन वन्य प्राण्यांस इजा होत आहे त्यामुळे आग लावणाऱ्याचा छडा लावला जाऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी सांगितले.
बारामती तालुक्यात वनक्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने विविध कामे व वन बचावण्यासाठी वन क्षेत्रामध्ये “फायर लाईन’ ( जाळ रेषा ) घेण्यात आली या प्रसंगी शुभांगी लोणकर यांनी सांगितले.
बारामती तालुक्यातील कनेहरी काटेवाडी, तांदुळवाडी, उंडवडी (कप) बऱ्हाणपूर, कऱ्हावागज,वंजारवाडी आदी गावातील वनविभागा च्या हद्दी मध्ये फायर लाईन घेण्यात आली.
या वेळी अधिकारी, कर्मचारी, वनमजुर व ग्रामस्थ उपस्तीत होते. आग लावणाऱ्या व्यक्ती जर सापडल्या किंवा ग्रामस्थांनी पकडून दिल्या तर नाव गुपित ठेऊन आग लावणाऱ्या व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करू असेही शुभांगी लोणकर यांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या विविध शंकाचे निरसन अधिकारी वर्गाने केले.
कायदेशीर सजा काय होऊ शकते
राखीव वन क्षेत्रामध्ये प्रवेश करणे कायद्याने गुन्हा असून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे व सरकारी संपत्तीची विल्हेवाट लावणे व निसर्गाचे नुकसान करून मानव जातीस व वन्य जीवास हानिकारक कृत्य करणे याच्या विरोधात भारतीय वन्य अधिनियम 1927 या कलमानुसार जास्तीत जास्त कडक शिक्षा होऊ शकते असे वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांनी सांगितले.