जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । अलिबाग । जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 1 स्कॉर्पिओ, 16 बोलेरो जीप व 22 मोटारसायकली पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज पोलीस कवायत मैदान, अलिबाग येथे पोलीस विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, अलिबाग उपविभागीय अधिकारी  प्रशांत ढगे, तहसिलदार मिनल दळवी, पोलीस विभागाचे अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

सर्वप्रथम पोलीस कवायत मैदानात आगमन झाल्याबरोबर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नव्या वाहनांचे  पूजन करण्यात आले व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे नव्या वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. त्यानंतर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून वाहने पुढे मार्गस्थ करण्यात आली.

जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच पोलीस बंदोबस्तांसाठी या वाहनांचा निश्चितच चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून पोलीस विभागासाठी नवीन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ही वाहने पोलीस विभागाला आज सुपूर्द करण्यात आली. पोलीस विभागामार्फत या वाहनांचा योग्य उपयोग करून पोलिसांमधील कार्यक्षमता व गतिमानता वाढण्यास मोलाची मदत होणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले की, पोलीस वसाहतीतील जुन्या इमारतीच्या जागी नवी इमारत बांधण्याच्या प्रस्तावासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. पोलीस विभागाला अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.


Back to top button
Don`t copy text!