दैनिक स्थैर्य । दि.२२ मार्च २०२२ । सातारा । सातारा शहराच्या हद्दीत समाविष्ट होऊनही तब्बल दोन वर्ष पायाभूत सुविधांची शाहूनगर परिसर झगडत आहे . अशा पार्श्वभूमीवर जय सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व उद्योजक सागर भोसले यांच्या प्रयत्नातून एसटी कॉलनी ते जगतापवाडी परिसर हा मार्ग पथक दिव्यांनी उजळला आहे या सुविधेबद्दल नागरिकांनी सोशल फाउंडेशन चे आभार मानले आहेत.
सातारा शहराची हद्दवाढ झाल्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पिछाडीला असणारा शाहूनगरमधील एसटी कॉलनी जगताप आणि हा परिसर सातत्याने पायाभूत सुविधांच्या संदर्भामध्ये झगडतो आहे कधी घंटागाडीच्या असुविधा तर कधी कच्चे रस्ते, तर कधी पाण्याची टंचाई , तर कधी अंधाराचे साम्राज्य यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे . या पायाभूत सुविधा देण्याकरिता नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करणारे जय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व उद्योजक सागर भोसले यांनी पालिकेच्या विद्युत विभागाकडे पाठपुरावा करून हा परिसर सर्व सुविधांनी समृद्ध कसा होईल याचे प्रयोग प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
स्वच्छ कॉलनी माझी कॉलनी या त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेला शाहूनगर परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशाप्रमाणे शाहूनगर परिसरात घंटागाडी आणि ट्रॅक्टर यांची संख्या वाढवण्यात आली आहे . मात्र या परिसरात सायंकाळी पाचनंतर प्रचंड अंधार पसरतो त्यामुळे नागरिकांना येता-जाता जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो अशी तक्रार होती . सागर भोसले यांनी नगरपालिकेच्या विद्युत विभागाकडे यासंदर्भातील प्रस्ताव सादर केले होते या प्रस्तावाची दखल पालिका प्रशासनाने घेऊन या भागांमध्ये पथदिव्यांची सोय केली आहे एसटी कॉलनी ते जगताप वाडी मारुती मंदिर या दरम्यान सहा एलईडी दिव्यांचे पथदिवे उभारण्यात आले असून त्यामुळे हा परिसर प्रकाशमान झाला आहे या पथदिव्यांची काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे परिसरातील नागरिकांनी सागर भोसले यांची गाठ घेतली व त्यांना गुलाब पुष्प देऊन विशेष धन्यवाद दिले.