स्थैर्य, मुंबई, दि. २२: एंजेल ब्रोकिंगने स्ट्रीक या स्ट्रॅटजिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केल्यानंतर जास्तीत जास्त एंजेल ब्रोकिंगचे ग्राहक स्ट्रॅटजिक ट्रेडिंग सोल्युशन्सचा वापर करत आहेत. या भागीदारीमुळे एंजेल ब्रोकिंगच्या ग्राहकांना कोणत्याही पूर्वीच्या कोडिंग माहितीविना व्यापार धोरण विकसित करुन त्यांच्या व्यापाराचे नियोजन आणि व्यवस्थापन करता येते.
स्ट्रीकच्या अंतर्ज्ञानी इंटरफेसमुळे एंजेल ब्रोकिंगच्या ग्राहकांना एका मिनिटात लाइव्ह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग धोरण तयार करणे, पुन्हा तपासून पाहणे आणि त्याचा प्रत्यक्षात वापर करणे शक्य झाले आहे. स्ट्रीकच्या सहकार्यातून, रिटेल ग्राहकांना प्री-बिल्ट धोरण शोधणे, ट्रेडिंग संकेतांसाठी लाइव्ह मार्केट स्कॅन करणे आणि कोडिंगविना पेपर ट्रेडिंग करता येते. (बॅक टेस्टिंग कामगिगरीचे विश्लेषण करताना) स्ट्रीकच्या प्री-बिल्ट धोरणांचा वापर करता येतो किंवा ग्राहकांना त्यांचे व्यापार धोरण अखंडपणे राबवता येते. एंजेल ब्रोकिंगच्या ग्राहकांना सेक्टरनुसार मार्केटचे स्कॅनिंग मिळते. किंवा व्यक्तीपरत्वे स्टॉकच्या बास्केटचीही माहिती मिळते.
एंजेल ब्रोकिंगचे मुख्य विकास अधिकारी श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “अत्याधुनिक तंत्रज्ञान सोल्युशन्स आपल्या प्लॅटफॉर्मवर वापरून आपले क्षेत्र समतल करण्यावर एंजेल ब्रोकिंग विश्वास ठेवते. यापूर्वी असे सोल्युशन्स केवळ व्यावसायिक, संस्थात्मक गुंतवणूकदार, हेज फंड्स आणि एचएनआय यांना वापरता येत होते. मात्र आता कोणतेही रिटेल गुंतवणूकदार हे वापरू शकतात. अशा एकत्रिकरणाच्या सुविधेद्वारे आम्हाला सर्व स्टेकहोल्डर्ससाठी ट्रेडिंग सोपे करायचे आहे. विशेषत: देशातील मिलेनिअल आणि पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे धोरण आहे.”
एंजेल ब्रोकिंगचे सीएमडी श्री दिनेश ठक्कर म्हणाले, “आज शेअरमार्केटमध्ये स्वयंचलित ट्रेड किंवा अल्गोरिदमिक ट्रेडिंग हळू हळू वाढत आहे. कारण हा तंत्रज्ञान चलित दृष्टीकोन अधिक प्रभावी, फायदेशीर आणि कमी चुकांचा आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीला ही सुविधा वापरण्यासाठी कोडिंगचे संबंधित
कौशल्य गरजेचे आहे. यामुळे सामान्य गुंतवणुकदाराला फायदा होत नव्हता. ते अल्गोरिदममध्ये काम करू शकत नव्हते. एंजेल ब्रोकिंगमध्ये, आमच्या ग्राहकांना ट्रेडिंगमधून सर्वाधिक फायदा मिळावा, असे आमचे धोरण आहे. याच तत्त्वावर आमची स्ट्रीकसोबत भागीदारी झाली असून एंजेल ब्रोकिंगच्या ग्राहकांचा पोर्टफोलिओ परफॉर्मन्स पूर्वीपेक्षा वाढत आहे.”