दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑक्टोबर २०२२ । सातारा । आशियाई विकास बँक अर्थ सहाय्यीत मॅग्नेट प्रकल्पांतर्गत उत्तम कृषी पद्धती -स्ट्रॉबेरी पीक एक दिवसीय कार्यशाळेचे भिलार येथे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण ॲकर एफ. पी. ओ. श्रीराम फळ प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित भिलार व पि.आय.यु.मॅग्नेट कोल्हापूर यांचेवतीने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्यात आले. या कार्यशाळेस १५० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
प्रशिक्षणाचे उद्घाटन स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. या कार्यक्रमास डॉ. सुभाष घुले, प्रकल्प उपसंचालक पि. आय.यु. मॅग्नेट कोल्हापूर, नितीन भिलारे, अध्यक्ष स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोशिएशन ऑफ इंडिया, श्री राजेंद्र भिलारे, श्री शिवाजी भिलारे, सौ सुनीता भिलारे, श्री गणपत पार्टे, तेजस्विनी भिलारे, श्री महेश रसाळ, श्री रावसाहेब बेंद्रे, श्री सुयोग टकले, श्री नितीश खाडे, उपस्थित होते. श्री गणपत पार्टे यांनी ॲकर एफ. पी. ओ. व मॅग्नेट प्रकल्पांतर्गत मंजुर झालेल्या प्रकल्पा विषयी प्रस्तावित केले.
प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी डॉ. सुभाष घुले यांनी मॅग्नेट प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील शेतमालाचे काढणी पश्चात नुकसान कमी होणार असून निर्यातीस चालना मिळणार आहे. ॲकर एफ. पी. ओ. यांची जबाबदारी वाढलेली असून अशा प्रकारचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत असे सांगितले.
डॉ. सुभाष घुले यांनी भौगोलिक मानांकन नोंदणी प्रक्रिया, डॉ. दर्शन कदम यांनी स्ट्रॉबेरी पिकाच्या चांगल्या शेती पद्धती, भूषण यादगिरवार यांनी एकात्मिक कीड रोग व अन्न द्रव्ये व्यवस्थापन, सुयोग टकले यांनी मॅग्नेट प्रकल्प रूपरेषा व संधी यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.