दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२२ । बारामती । दिनांक ३०/९/२०२२ रोजी म.ए.सो.सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती या शाळेत दि. ३०/९/२०२२ व दि.१/१०/२०२२ रोजी अनुक्रमे कथाकथन व नाट्यछटा स्पर्धा घेतल्या. इयत्ता १ ली व इयत्ता २ री साठी नाट्यछटा स्पर्धा घेतल्या व इयत्ता ३ री व इयत्ता ४ थी साठी कथाकथन स्पर्धा घेतल्या. यात एकूण बारामती परिसरातील नामवंत १३ शाळांनी सहभाग घेतला. एकूण ९० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला.
कथाकथन व नाट्यछटा स्पर्धा या विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच सभाधितपणा व अभिनव कौशल्य विकास व्हावा यासाठी घेण्यात आल्या. दि.३०/९/२०२२ रोजी कथाकथन स्पर्धांचे उद्घाटन म.ए.सो.सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब बडधे व म.ए.सो.कै.ग.भि.देशपांडे विद्यालय येथील श्री.नेवसे सर, श्री.गडकर व सौ.देशपांडे यांनी केले. त्यांनीच कथांचे व नाट्यछटांचे चे परीक्षण करून कथा कशी निवडावी? कथा कशी असावी? कथाकथन कसे असावे? याबद्दल विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना मार्गदर्शन केले. कथाकथन या स्पर्धेचे बक्षीस वितरण सौ.सोनाली क्षीरसागर मुख्याध्यापिका (हरीभाऊ देशपांडे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल) यांच्या शुभहस्ते झाले.
बक्षीस पात्र विद्यार्थी
प्रथम क्र- कु. ईश्वरी संदीप शिंदे (म.ए. सो.सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा )
द्वितीय क्र- कु.शर्वरी संजय चौधरी (न्यू इंग्लिश मीडियम स्कूल विद्या प्रतिष्ठान)
उत्तेजनार्थ-१. चि.शिवरूप रणजीत घाडगे (म.ए. सो.सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा)
२.क्र-चि.साईराज यशवंत जगदाळे (शारदाबाई विद्यानिकेतन स्कूल)
*विशेष सादरीकरण
१) चि. ध्रुव राहुल जगताप (श्री विठ्ठल प्राथमिक विद्यालय मंदिर पणदरे)
२) चि.अनुराज सातेश्वर कुंभार (जनहित विद्यामंदिर)
३) कु. अणवी हनुमंत खुळे (बी.सी.ए वालचंदनगर)
४) कु. प्रेरणा मनोहर कांबळे (सरस्वती विद्या मंदिर)
नाट्यछटा या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री.उमेद सय्यद (मुख्याध्यापक , कै.ग.भि.देशपांडे विद्यालय) यांच्या शुभहस्ते झाले.
बक्षीस पात्र विद्यार्थी
प्रथम क्र- कु.श्रीजा शिरीष गावडे (न्यू इंग्लिश मीडियम स्कूल विद्या प्रतिष्ठान)
द्वितीय क्र- चि.श्लोक आशिष माळवंदे (विद्या प्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळा)
उत्तेजनार्थ क्र- चि.सुप्रज्ञ शंकर खिलारे (शारदाबाई पवार विद्यामंदिर)
उत्तेजनार्थ- कु.भुवनेश्वरी रणजीत जाधव (म.ए. सो.सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा)
विशेष सादरीकरण-
१) कु. स्वरा सुमित साबळे (बी.सी.ए वालचंदनगर)
२) कु. सिद्धी मंगेश निंबाळकर (महात्मा गांधी बालक मंदिर)
३) कु.कार्तिकी भाऊसो लोखंडे (श्री. विठ्ठल प्राथमिक विद्यामंदिर पणदरे)
४) कु. श्रेया सचिन खैरे (शारदाबाई पवार विद्यानिकेतन डे स्कूल)
या दोन्ही स्पर्धांना मार्गदर्शन व प्रोत्साहन शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री भाऊसो बडधे यांनी केले. तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका सौ.अनिता तावरे यांनी सहकार्य केले.
सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.