मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त कथालेखन स्पर्धेचे आयोजन


स्थैर्य, 25 फेब्रुवारी, सातारा : राज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला. यंदा या मराठी भाषा पंधरवड्याचे 15 वे वर्ष असून त्यानिमित्त कथालेखन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पाच कथांकरिता सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

या कथालेखन स्पर्धेसाठी भाग घेऊ इच्छुकांनी कथा सचिन सावंत (9860522706) या क्रमांकावर दि.2 मार्च 2026 पर्यंत व्हॉट्सप करावी किंवा दि गुजराथी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी, 159, भवानी पेठ, सातारा या पत्त्यावर पोस्ट करावी. ही कथा लेखन स्पर्धा सर्वांसाठी खुली असून कथेची शब्द 800 ते 1000 असावी, कथेला विषयाचे बंधन नाही, कथा स्वरचित व यापूर्वी कुठेही प्रसिध्द न झालेली असावी, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. बक्षीस समारंभाची तारीख व वेळ नंतर जाहीर करण्यात येईल. या कथालेखन स्पर्धेत जास्तीत लेखकांनी सहभागी घ्यावा असे आवाहन मसाप, पुणे शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत आणि सातारा नगरपरिषदेने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!