
स्थैर्य, सातारा, दि. १६: वादग्रस्त टोलनाका म्हणून ओळख असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सातारा पुणे हायवे वरील आनेवाडी टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्याला अज्ञात टोळक्यांनी बेदम मारहाण झाली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे आनेवाडी टोल नाक्यावर काल रात्री काही तासासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते.
यासंदर्भात घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नेहमीच रविवारी आनेवाडी टोल नाक्यावर तुफान गर्दी असते यावर टोल वसुलीसाठी टोल कर्मचारी सक्तीची टोल वसुली करत असतानाच पुण्याच्या दिशेने जाणारी ईरटीका गाडी थेट दोन कर्मचाऱ्यांनी नोंद घेण्यासाठी अडवली यातच ईरटीका गाडीने थेट टोल कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घातली असल्याची तक्रार केली या सर्व प्रकारामुळे ईरटीका गाडी मध्ये प्रवास करणारी एक महिला प्रवासी व दोन कर्मचारी यांच्यात जोरदार वाद विवाद निर्माण झाली या वाद वादामध्ये रूपांतर अचानकच काही तासानंतर तुफान हाणामारी मध्ये निर्माण झाले सदर महिला वाहनचालक ह्या भोर तालुक्यातल्या होत्या त्यांच्या मदतीसाठी काही स्थानिक युवक टोळकं त्याठिकाणी आलं आणि महिला प्रवासाला उद्धट वर्तन केले हे कारण सांगून थेट या टोळक्याने दोन कर्मचाऱ्याला तुफान हाणामारी करण्यास सुरुवात केली यातच जोरदार धुमश्चक्री झाल्यानंतर आने वाडी टोल नाक्यावर त्यांना पूर्वक वातावरण निर्माण झाली तोड कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यानंतर हे सर्व प्रकरण भुईंज पोलिस स्थानकामध्ये गेले रात्री उशिरापर्यंत हा सर्व लवाजमा पोलिस तक्रारीसाठी उपस्थित होता मात्र रात्री उशिरापर्यंत या संदर्भात तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान स्थानिक युवकांचा टोळकं नेमकं कोणत्या गावाचं होतं या बाबत अद्याप ही माहिती समोर आली नाही सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने हाणामारी करत वातावरण तंग करणे असे प्रकार आनेवाडी टोल नाक्यावर सातत्याने घडत असतात त्यातील काल रात्री झालेला हा प्रकार लक्षात घेता असे प्रकार सातत्याने होत असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या अंदाधुंदी रोज होणाऱ्या हाणामारी यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी देखील वाहनचालकांकडून होऊ लागली आहे