राज्यपाल नियुक्त आमदार यादी रोखणे 50 वर्षांत एकमेव घटना, टोकाची भूमिका संसदीय लोकशाहीला घातक : पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सांगली, दि.२४: मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रोखण्याचा भारतीय संसदीय लोकशाहीतील ५० वर्षांच्या काळातील ही एकमेव घटना आहे. महाराष्ट्राला मात्र या वेळी वेगळा अनुभव मिळत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राज्यपालांकडे शिफारस केलेल्या यादीतील एखाद दुसऱ्या नावाबाबत आक्षेप घेण्याचे प्रकार देशात काही वेळा घडले आहेत, परंतु शिफारस केलेल्या सर्वच नावांबाबत संशय निर्माण करून ही नावे जाहीर न करणे हा प्रकार मात्र प्रथमच घडत असावा. मंत्रिमंडळाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाबाबत टोकाची भूमिका घेणे हे संसदीय लोकशाहीला घातक आहे,असे पवार म्हणाले.

साखर संघाच्या अध्यक्षपदी पी.आर.पाटील यांची निवड
राज्य साखर कारखाना संघाचे विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचा कार्यकाळ येत्या मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदासाठी पी.आर. पाटील यांची निवड निश्चित करण्यात आली आहे, असे पवारांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!