इतिहासाचे विकृतीकरण थांबवा पुढच्या पिढीला काय उत्तर देणार ? पुणे येथील पत्रकार परिषदेत बोलताना खासदार उदयनराजे भोसले भावूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । सातारा । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल जाणीवपूर्वक करण्यात येणारे इतिहासाचे विकृतीकरण हे तातडीने थांबले पाहिजे . अन्यथा भविष्यातील येणारी पिढी आपल्याला काय म्हणेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सध्या मोडतोड होते आणि आपण त्याकडे हातावर हात धरून पाहत बसलोय या विषयाकडे महाराष्ट्रातील जनतेने गांभीर्याने पाहायला हवे हे विकृतीकरण थांबवले नाही तर आपल्याला पुढची पिढी कधी माफ करणार नाही असे रोखठोक प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे अशी जोरदार मागणी त्यांनी केली मात्र हे बोलत असताना उदयनराजे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये छत्रपती शिवरायांच्या संदर्भात झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्य संदर्भात उदयनराजे तळमळीने बोलताना कमालीचे आक्रमक झाले.

ते म्हणाले , ” छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान होत असेल तर मी मेलो असतो ते परवडेल . राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वक्तव्य खूपच निंदनीय आहे यासंदर्भात आम्ही पक्षांच्या वरिष्ठांकडे लेखी तक्रार नोंदवून या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल करण्यात येणारे विकृतीकरण तातडीने थांबले पाहिजे अन्यथा येणारी पिढी आपल्याला काय म्हणेल ? त्यांच्या इतिहासाची होणारी मोडतोड हा विषय निश्चितच गांभीर्याने घेतले जाणे गरजेचे आहे .एका वेगळ्या इतिहासाचा चुकीचा आणि खोटा संदेश पुढच्या पिढीकडे जातोय हे सुद्धा लक्षात यायला हवे महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांमध्ये देशद्रोहाच्या कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उदयनराजे यांनी केली ही भूमिका मांडत असताना उदयनराजे यांचा कंठ अचानक दाटून आला.

ते पुढे म्हणाले छत्रपती शिवरायांबद्दल असं वक्तव्य केल्यावर देखील कारवाई होत नसेल तर कोणालाच छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेण्याचा अधिकार नाही . सध्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गलिच्छ वातावरण तयार केले जाते पण शिवरायांच्या संदर्भात आपमान होत असेल तर ते कदापी खपवून घेतलं जाणार नाही यासंदर्भात आम्ही पुन्हा तीन डिसेंबर रोजी किल्ले रायगडला जाणार असल्याचे उदयनराजे भोसले यांनी बोलताना स्पष्ट केले उदयनराजे यांनी काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी ,राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यपालांना तात्काळ हटवण्याची मागणी केली होती या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने तडकाफडकीने उदयनराजे यांनी आपली भूमिका मांडली.


Back to top button
Don`t copy text!