थांबणारा नेता म्हणजे शरद पवार नव्हेत : रोहित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३ जुलै २०२३ | सातारा |
राज्याच्या राजकारणात काल जे काही घडलं, त्यामुळे शरद पवार थांबलेले नाहीत. शरद पवार थांबणारा नेता नाही. शरद पवार यांनी कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. या ठिकाणी मोठा जनसमुदाय उसळला. हे लोकांचे प्रेम आहे. या ताकदीपेक्षा मोठी ताकद कुठलीही होऊ शकत नाही. पुढे आपण पाहाल साहेबांची आणि लोकांची ताकद केवढी मोठी आहे, असे आ. रोहित पवार यांनी सांगितले.

सातारा येथील विशामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांना विनंती करू शकतो. त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, अशा परिस्थितीत मी त्यांना विनंतीशिवाय काही करू शकत नाही. ते पक्ष सोडून गेल्याने मनाला खूप वाईट वाटले, असे सांगून भाजपला आम्ही विरोध केला होता आणि त्यांच्याबरोबरच जाणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. आज जसा जनसमुदाय उसळला तसाच जनसमुदाय शरद पवारांच्या मागे कायमस्वरूपी राहणार आहे. जे आमदार काल मुंबईमध्ये दिसले. त्यांना वेगळं काही तरी सांगितले गेले होते. अध्यक्षांच्या बाबतीत चर्चा करायचे आहे, असे सांगून सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावले होते. म्हणून त्या आमदारांनी विचार सोडले. असे आपल्याला म्हणता येणार नाही. ज्यांना लोकांमधून निवडून यायचे आहे, ते सर्व आमदार पुन्हा एकदा राष्ट्रवादीत माघारी येतील, असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

कोणत्याही आमदाराला फसवून नेले नव्हते. कारण देऊनच त्या ठिकाणी बोलावले होते. सह्या घेतल्यानंतर राजभवनामध्ये नेण्यात आले. ज्यांना शरद पवारांनी विविध पदे दिली, त्यांना मोठे केले, ते सगळे आज पवारांना धोका देऊन सत्तेत गेले आहेत, असे रोहित पवार म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!