बिले भरली नाहीत म्हणून डीपी सोडवण्याचे प्रकार बंद करा : जयकुमार शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री आवळेकर साहेब यांना भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने वतीने निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना हा त्रास देऊ नका अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस संतोष सावंत, सरचिटणीस सुधीर जगदाळे, आळजापुर चे रामचंद्र करचे, आदरुड रोहित करणे, सोमनाथ रासकर, गणेश रासकर, तालुक्यातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

फलटण तालुक्यातील महावितरण केंद्राच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी वेळेत विजेची बिले न भरल्यामुळे त्यांना कोणतीही पूर्वसचना न देता, तसेच डीपी निहाय वीज वितरण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आगाऊ बैठका न घेता, तसेच त्याबाबत आढावा घेऊन पूर्वसूचना न देता, सर्व डीपी थेट पध्दतीने सोडवण्यात आले आहेत. हि बाब पिकांचे हेतूपुरस्सर नुकसान करणारी आणि अघोरी प्रकारची असून, प्रशासकीय पद्धतीमध्ये बसत नाही.

यासाठी सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे ऊस न गेल्यामुळे त्यांच्याकडे पैशाची चणचण आहे, रब्बीची कामे चालू आहेत, ऊस गेल्यानंतर बिले भरता येतील, तोपर्यंत फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना बिलाच्या 15 ते 20 टक्के रक्कम भरणा करण्याची सवलत द्यावी, तसेच प्रथम डीपी निहाय वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा आढावा घेऊन थकित बिले भरणे बाबतची तारीख निश्चित करून द्यावी. निश्चित केलेल्या तारखेस वरील प्रमाणे बिले न भरल्यास, डीपी सोडवण्यात येईल याची माहिती शेतकऱ्यांना अवगत करून द्यावी, यामुळे शेतकरी निश्चितपणे वीज वितरण कंपनीत सहकार्य करतील आणि सिस्टम मध्ये सुधारणा होऊ शकते.

याप्रमाणे कृपया क्षेत्रिय अधिकाऱ्यांना डिपी निहाय तारखा निश्चित करून देऊन बैठकांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यास सांगावे. कृपया शेती आणि शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता व नियोजन होण्यास विनंती आहे. जर याबाबत शेतकऱ्यांना नाहक त्रास झाल्यास आम्ही आंदोलन उभे करुअसे हि शिष्टमंडळाचे वतीने सांगितले आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता यांनी यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन शेतकऱ्यांना न्याय देऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.


Back to top button
Don`t copy text!