स्थैर्य, मुंबई, दि. २७ : राज्यात ई-पास बाबतच्या नियमावरून विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीला ई-पास नियमावलीवरून लक्ष्य केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, “पती-पत्नी घरी एकत्र राहू शकतात मात्र स्कूटरवर बसू शकत नाहीत. अनोळखी लोकांबरोबर प्रवास करायला परवानगी आहे मग परिवाराला एकत्र प्रवास करण्यावर निर्बंध का? उद्धव सरकारपण मोदी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. लोकांच्या वैयक्तिक गोष्टींवर निर्बंध आणणं बंद करा. सरकारने कोव्हिडचं नाटक बंद करून खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, पूरस्थिती याकडे सरकारने लक्ष द्यावे अन्यथा राज्यावर मोठं संकट येईल.”