चोरीस गेलेला टेम्पो ४ तासामध्ये हस्तगत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । वाई । सोनगिरवाडी, ता. वाई येथील पांचवडकडे जाणाऱ्या रोडडेला लावलेला 10 लाख 50 हजारांचा टेम्पो (एमएच 12 एचडी4171) चोरीस गेला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच वै पोलिसांनी जलद तपास करून चार तासात आरोपीला जेरबंद केले.

याबाबतची माहिती अशी, दि. 21 रोजी रात्री सोनगीरवाडी, वाई, येथील धुमाळ वजन काटा नावाच्या दुकानासमोर लावलेला 10 लाख 50 हजार रुपये किमतीचा चॉकलेटी रंगाचा टेम्पो (क्रमांक एमएच 12 एचडी ४१७१) चोरीस गेला. याबाबतची फिर्याद कीर्तीकुमार मोहनलाल ओसवाल यांनी वाई पोलीस ठाण्यात नोंदवली. यानंतर

वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाने टेम्पोचा तपास सुरु केला. यावेळी पोलिसांना माहीती मिळाली की, चोरीस गेलेला टेम्पो व आरोपी महिगांव ता.जावली येथे आहेत. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाने टेम्पो व आरोपी यांचा महिगांव येथे शोध घेतला. शोध घेत असतांना बंद पडलेल्या स्टोन क्रशर समोर टेम्पो क्र.एमएच 12एचडी4171 हा उभा असलेचे दिसले. त्याठिकाणी पोलीस कर्मचारी गेले असता टेम्पोमध्ये बसलेले दोनजण पोलीसांची चाहुल लागताच पळुन जाऊ लागले. त्यांचा पाठलाग करुन पोलीसांनी त्यांना पकडले. त्यांची चौकशी केली असता त्या दोघांनी टेम्पो चोरी करुन आणला असलेचे मान्य केले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन 10,50,000/-रु.किंमतीचा टेम्पो क्र एमएच12/एचडी/4171 हा जप्त करण्यात आलेला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी (वाई विभाग) शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहा.पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, महीला पोलीस हवालदार सोनाली माने, क्षमा माने, पो.कॉ.अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर श्रावण राठोड यांनी केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!