
दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण शहर पोलिसांनी मेटकरी गल्ली येथे टाकलेल्या छाप्यात विक्रीसाठी ठेवलेला सुमारे १३,२०० रुपयांचा नायलॉन मांजाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहरूख दस्तगीर काझी (वय २७, रा. मेटकरी गल्ली, फलटण) याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अधिक तपास म.पो.ना. पूनम बोबडे करत आहेत.