स्थैर्य, मुंबई, दि. २०: आज बाजाराच्या निर्देशांकात अर्ध्या टक्क्यांनी घसरण झाल्याने बाजार गंभीर पातळीवर संघर्ष करत असल्याचे दिसून आले. दिवसातील उच्चांकी ५०,२७९.०१ स्थितीवरून सेन्सेक्स जवळपास ४०० अंकांनी घसरून ४९,९०२ अंकांवर स्थिरावला. मागील क्लोजिंगच्या तुलनेत तो २९०.६९ अंक किंवा ०.५८% नी घसरला. तर दुसरीकडे निफ्टी ७७.९५ अंक किंवा ०.५२ % घसरला. धातू, वित्त आणि वाहन निर्देशांकांनी बाजार खाली आणला तर रिअॅलिटी, पॉवर आणि आरोग्य सेवा निर्देशांकांनी बाजाराला आधार दिला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.
अदानी ग्रीन: एसबी एनर्जी इंडियाच्या पुनर्निर्माणयोग्य ऊर्जा पोर्टफोलिओ मिळवण्याच्या योजनेमुळे अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांनी घट झाली. या घोषणेचा भाग म्हणून ग्रीन एनर्जी लीडर असलेली ही कंपनी एसबी एनर्जीकडून पुनर्निर्माणयोग्य ५ जीडब्ल्यू पॉवर पोर्टफोलिओ प्राप्त करेल. यात पूर्ण एंटरप्राइज इव्हॅल्युएशन (ईव्ही) समाविष्ट आहे. त्याचे मूल्य २६,००० कोटी रुपये किंवा ३.५ अब्ज डॉलर एवढे आहे. अदानी ग्रीन हा शेअर बुधवारी १२४१.५५ रुपयांवर स्थिरावला.
हॅपीएस्ट माइंड्स: हॅपीएस्ट माइंड्सने अलीकडेच कोका कोला बॉटलिंग कंपनी युनायटेडच्या ऑर्डर मॅनेजमेंटला सुलभ करण्याकरिता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट राबवला. हा प्रकल्प आरपीएसाठी मायक्रोसॉफ्ट पॉवर ऑटोमेटला लाभकारक असल्याचे कंपनीने घोषित केले. कंपनीचा शेअर मागील क्लोजिंच्या तुलनेत १.६३ टक्क्यांनी वाढून ७६०.२५ रुपयांवर स्थिरावला.
टोरेंट फार्मा: टोरेंट फार्माने तिमाहीच्या नफ्यात २.९ टक्क्यांची वृद्धी नोंदवली. ती मागील तिमाहीतील ३१५ कोटी रुपयांच्या तुलनेत ३२४ कोटी रुपये एवढी झाली. त्याचप्रमाणे फार्मास्युटीकल मेजरचा महसूल १,९४६ कोटी रुपयांवरून १,९३७ कोटी रुपयांवर घसरला. तथापि, कंपनीचे मार्जिन ३०% झाले आणि त्याचा ईबीआयटीडीए ६.२ टक्क्यांनी वाढला आणि ५८२ कोटी रुपये झाला. टोरेंट फार्मा स्टॉक १.२५% नी वाढला आणि क्लोजिंग बेलच्या वेळी त्याने २,७५७.८५ रुपयांवर व्यापार केला.
टाटा मोटर्स: ऑटो मेजरच्या शेअरची किंमत ५.५२ टक्क्यांनी घसरली. कंपनीने वित्तवर्ष २०२१ मधील चौथ्या तिमाहीत एकूण तोटा ७,६०५.४ कोटी रुपये एवढा नोंदवला. मागील तिमाहीत, फर्मने २,९०६.४५ कोटी रुपये नफा नोंदवला. तर टाटा मोटर्सने महसूलात मोठी वाढ दर्शवूनही तोटा झाला. एकूण तोटा असला तरीही मागील वर्षी याच कालावधीतील ९,८९४.२५ रुपयांच्या तुलनेत हा तोटा होता. टाटा मोटर्सचे शेअर्स बुधवारी ३१४.१० रुपयांवर स्थिरावले.
ग्लँड फार्मा: ग्लँड फार्माने चौथ्या तिमाहीतील एकूण निव्वळ नफा २६०.४ कोटी रुपयांचा झाल्याचे नोंदवले. फर्मने मजबूत विक्री अनुभवल्यानंतर ही ३४ टक्क्यांची वृद्धी दिसून आली. मागील वर्षी याच कालावधीत फार्मास्युटिकल कंपनीने १९४.८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा दर्शवला. दिवसभरात या स्टॉकने ७.६९ टक्क्यांची वृद्धी अनुभवली आणि त्याने ३,२९८ रुपयांचे मूल्य गाठले.