दैनिक स्थैर्य | दि. २५ एप्रिल २०२३ | फलटण |
मांडवखडक व विंचुर्णी (ता. फलटण) गावांच्या शेतीपंपाचे अनधिकृत लोडशेडींग बंद करण्यासाठी येथील शेतकर्यांनी राज्य विद्युत मंडळाचे फलटण ग्रामीणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले आहे.
या पत्रात शेतकर्यांनी म्हटले आहे की, मांडवखडक व विंचुर्णी या गावांना सोमवार ते गुरुवार या वारांसाठी दिवसा व शुक्रवारी रात्री चार तासांचे लोडशेडींग केले जात आहे. हे लोडशेडींग ताबडतोब बंद करून शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत व अखंडित सुरू करावा, असे म्हटले आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, या लोडशेडींगमुळे येथील सर्व शेतकर्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे. हे लोडशेडींग बंद केले नाही तर आमच्या होणार्या आर्थिक नुकसानीस वीज कंपनी जबाबदार राहील व त्याची नुकसान भरपाई द्यावी लागेल.
या पत्रावर कार्यवाही झाली नाही तर आम्हाला आत्मदहन करावे लागेल, असा इशाराही शेतकर्यांनी दिला आहे.