
दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण बसस्थानकाच्या अंतर्गत असणारे पोलीस मदत केंद्र बंद अवस्थेत असल्याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट दैनिक “स्थैर्य”च्या माध्यमातून करण्यात आलेला होता. सदरील ग्राउंड रिपोर्ट प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये फलटण शहर पोलीस स्टेशन व फलटण बसस्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण बस स्थानकांमधील पोलीस मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
गतकाही दिवसांपूर्वी स्वारगेट बस स्थानक येथे जी दुर्दैवी घटना झाली त्यानंतर फलटण बस स्थानकामध्ये असणारे पोलीस मदत केंद्र बंद अवस्थेत असल्याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट दैनिक स्थैर्य माध्यमातून करण्यात आलेला होता.
त्यानंतर फलटण शहर पोलीस स्टेशन व फलटण बस स्थानकाच्या माध्यमातून तातडीने फलटण बस स्थानकाच्या अंतर्गत असणारे पोलीस मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे.