स्टॅच्यू ऑफ युनिटी : लोहपुरुषाच्या जयंतीदिनी सुरू होऊ शकते क्रूझ सेवा, 4 तासांच्या सहलीसाठी 250 रुपयांचे तिकीट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१०: स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ ३१ ऑक्टोबर रोजी ६ किमी लांबीचा क्रूझ मार्ग सुरू होऊ शकतो. सरदार वल्लभभाई पटेल यांची ३१ ऑक्टोबर रोजी जयंती असून हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या केवडिया येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरास भेट देण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या हस्ते क्रूझ सेवेचे लोकार्पण होण्याचीही शक्यता आहे. या सोहळ्याची तयारी सुरू आहे. मोदींचा दौरा १२ मार्च रोजी प्रस्तावित होता. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे तो रद्द झाला.

4 तासांच्या सहलीसाठी 250 रुपयांचे तिकीट : क्रूझची क्षमता २०० प्रवाशांची आहे. परंतु काेरोनामुळे फक्त ५० जणांना तेथे प्रवेश देण्यात येईल. तिकिटांची किमत २५० ते ३०० रुपये इतकी असेल. क्रूझने सरोवरात ४ तास सैरसपाटा मारता येईल. ६ किमी दौऱ्यात सैर करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य असेल.

44 लाख लोकांनी दोन वर्षांत दिली भेट

गेल्या दोन वर्षांत ४४ लाखांहून अधिक लोकांनी स्टॅच्यू आॅफ युनिटीला भेट दिली आहे. देशविदेशातील पर्यटकांना आनंद लुटता यावा म्हणून येथे अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. मात्र कोरोना काळात या परिसरात लोकांना भेट देता आली नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!