पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण


दैनिक स्थैर्य । दि.०५ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपा नेते आशिष शेलार व भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाची तयारीची बैठक आज प्रदेश कार्यालयात पार पडली. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहीत, चिटणीस प्रविण घुगे व कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!