बुलडाणा येथे राज्य परिवहन मंडळाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा


 

स्थैर्य, मुंबई, दि. २४; बुलडाणा येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीस परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

मंत्रालयात आज परिवहनमंत्री ॲड. परब यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ म्हणून बुलडाणा जिल्ह्याची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर पुतळा उभारण्याची मागणी डॉ. शिंगणे यांनी केली होती. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याविषयीचा हा प्रस्ताव राज्य परिवहन मंडळाच्या बोर्ड मिटींगमध्ये घेण्यात यावा तसेच याबाबतचे निवेदन विधिमंडळात सादर करण्यासाठी तयार करण्यात यावे, असे निर्देश ॲड. परब यांनी संबधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!