दैनिक स्थैर्य | दि. 18 ऑगस्ट 2024 | फलटण | राज्यामध्ये सर्वात मोठा कामगार मेळावा हा फलटण येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केला आहे. मी कामगार मंत्री झाल्यापासून अनेक मेळावे बघितले आहेत. परंतु आज फलटणमध्ये जो मेळावा पार पडत आहे; हा अतिशय शिस्तबद्धरित्या संपन्न होत आहे. इथे आल्यावर प्रथम नोंदणी त्यानंतर आमच्या कामगार माता बंधू बघिणींना पाण्याची व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. हा फलटणचा मेळावा अतिशय शिस्तबद्ध आहे. या सर्व बाबींचा विचार करता राज्यातील सर्वात मोठा बांधकाम कामगार मेळावा हा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने फलटण येथे संपन्न होत आहे; असे मत कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांनी व्यक्त केले.
फलटण – पंढरपूर रोड वरील “श्री दत्त गार्डन” मंगल कार्यालयात कामगार मेळाव्याचे आयोजन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, भाजपा फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
यावेळी बोलताना ना. खाडे म्हणाले कि; माझी पूर्वीची परिस्थिती ही अतिशय हलाखीची होती. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण ते अगदी माझगाव डॉक मध्ये मी कामगार म्हणून काम करीत होतो. देवेंद्र फडणवीस व अमित शहा साहेबानी हेच ओळखून मला मंत्री करताना कामगार मंत्री पद दिले. मी पूर्वी तब्ब्ल १० ते १२ वर्षे माझगाव डॉक मध्ये काम केल्याने कामगारांची प्रश्न व व्यथा नक्की काय आहेत हे मला माहिती होती. ज्या दिवशी मी कामगार मंत्री झालो त्या दिवशी मी शपथ खाल्ली कि मी कामगार मंत्री झाल्यावर मी कामगारासांठी नक्की काही ना काही करणार. मी मंत्री झाल्यानंतर कामगारांना प्रथम सेफ्टी किट सुरु केले; त्याचे कारण सुद्धा तसेच होते कि कामगार हा कायम कोणत्याही ठिकाणी कोट्याही परिस्थिती मध्ये कामकाज करीत असतो त्यामुळे त्याची सेफ्टी हि प्रथम आवश्यक आहे. त्यानंतर कामगार महिलांना भांडी देण्याचा निर्णय केला आहे. घरेलू कामगारांना सुद्धा आम्ही किट देण्याचे काम केले आहे. आता घरेलू कामगारांना सुद्धा किट उपलब्ध करून देणार आहे. कामगारांसाठी एक पुस्तक छापले आहे; त्यामध्ये सर्व प्रोसेस आम्ही त्यामध्ये स्पष्ट केले आहे.
आताच्या प्रमाणे फलटण तालुक्यातील सर्वांना आम्ही किट्स देणार आहे. सातारा येथे आम्ही कामगार भवन उभारणार आहोत. त्या ठिकाणी कामगारांना एका छताखाली आम्ही सर्व गोष्टी उपलब्ध करून देणार आहे. कामगारांसाठी आम्ही जिल्हा निहाय ऍम्ब्युलन्स आणली आहे; त्यामध्ये जिल्ह्यातील ३ मल्टीस्पेस्थालिस्ट हॉस्पिटल आम्ही नोंदणी केली आहे. त्यामध्ये आम्ही त्यांना सर्व सोयी पुरवणार आहोत. लोकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन पावले पुढे सारले पाहिजे आम्ही चार पावले पुढे यायला तयार आहे. ह्या कामगार बंधू बहिणीचे टाळू वरील लोणी खाण्याचा कुणीही प्रयत्न केला तर मी तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कोणतीही योजना बंद करण्याची नीती आमची नाही. उद्या विधानसभेला जर दुसरे आले तर ते हि आमची स्कीम म्हणून बंद सुद्धा करू शकतात; असेही मंत्री ना. खाडे यांनी स्पष्ट केले.
बांधकाम कामगारांना भांडी वाटपाची जी मूळ संकल्पना आहे ती मंत्री खाडे साहेबांची होती. आज फलटण तालुक्यात तब्ब्ल ४००० बांधकाम कामगारांना भांडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुमारे दहा ट्रक मध्ये हि भांडी असून याचा फायदा फलटण तालुक्यातील बांधकाम कामगारांना होणार आहे. आज ह्या बांधकाम कामगार घरच्यांना खाडे साहेबांच्या मुळे भांडी मिळत आहेत. उद्या रक्षाबंधन निमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या घरामध्ये निमित्त घरामध्ये हि भेट जाणार आहे. आज ४ हजार कुटुंबियांना भांडी वाटप करण्यात येत आहे. तर आज खाडे साहेबांना फलटण तालुक्याच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत कि फलटण तालुक्यात १५ हजार बांधकाम कामगारांच्या घरामध्ये आपल्याला भांडी द्यायची आहेत. तालुक्यात लाडकी बहीण योजना हि यशस्वीरित्या राबविली असून तब्बल ७२ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामधील प्रथम टप्प्यात ५० हजार हुन अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झाला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना ह्या आपल्याला सुरु आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास शेतकरी कृषी सन्मान योजना हि आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या सोबत आता राज्य सरकार सुद्धा या योजनेमध्ये आपले योगदान देत असल्याने सर्वसामान्य शेतकरी बंधू हे खुश आहेत; असे मत माजी खासदार रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाले कि; राज्य शाशनाच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना सुद्धा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता बहिणीप्रमाणे भावाने नाराज होण्याचे काही कारण नाही. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या साठी आयुष्यमान भारत व महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून अनेकांना लाभ होत आहे. उज्वला योजनेच्या माध्यमातून लाईट बिल मोफत झाले आहे. यासोबतच या योजनेचं गॅस सिलेंडर सुद्धा मोफत वितरण होत आहेत. शेतकऱ्यांची जुनी लाईट बिल आता माफ करण्यात आली आहेत. तुम्हाला शेतकरी बांधवाना जर कुणी लाईट बिलाचे जुने पैसे मागायला आले तर मला सांगा. आपल्या तालुक्यातून गेलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून झाला आहे. फलटण तालुक्यात धोम बलकवडी व नीरा देवधर धरणातील पाणी देण्याचे काम आले लाडके उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झाले आहे.