दैनिक स्थैर्य | दि. १८ डिसेंबर २०२४ | फलटण |
परभणी येथे झालेल्या भारतीय संविधानाच्या अवमानासंदर्भात निषेध करत सातारा जिल्हा पूर्वचे जिल्हा, तालुका, शहर, महिला आघाडी पदाधिकारी, हितचिंतक व संविधान समर्थक व इतर संघटनेचे पदाधिकारी यांनी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, उपाध्यक्ष सुभाष गायकवाड ज्येष्ठ नेते, महिला आघाडी उपाध्यक्षा चित्रा गायकवाड, विकास निकाळजे प्रसिद्धी प्रमुख, रणजित मोहिते जिल्हा संघटक, चंद्रकांत गायकवाड, फलटण तालुकाध्यक्ष संदीप काकडे, दिनकर जगताप, विजय कांबळे, फलटण शहर उमेश कांबळे, सूर्यकांत कांबळे व इतर मान्यवरांच्या उपस्थित हे निवेदन देण्यात आले.