
दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑक्टोबर २०२२ । फलटण । फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्यावती वतीने ओला दुष्काळ जाहिर करावा या मागणीचे निवेदन फलटणचं तहसीलदार यांना देण्यात आले.
या निवेदनात राज्यात ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा.शेतकर्यांना सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये मदत देण्यात यावी. फलटण तालुक्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन सरसकट आर्थिक मदत करण्यात यावी. मजुंरासाठी विशेष अनुदान जाहिर करण्यात यावे. मोदी सरकारच्या चुकीच्या शेतकरी धोरणामुळे भारताची जागतिक भुक निर्देशांकात घसरण झालेली आहे.हे खेदजनक आहे.आपला देश जगातील 121 देशांमध्ये 107 व्या क्रमांकावर आलेला आहे.तरी केंद्र सरकारने नव्याने शेतकरी धोरण शेतकरी हिताचे व व्यापक स्वरुपात मांडावे. या मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
याप्रसंगी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे,सातारा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस शंकर लोखंडे,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस गंगाराम रणदिवे,युवक तालुका अध्यक्ष अजिंक्य कदम, अल्पसंख्याक विभाग शहर अल्ताफ पठाण,अनु.जा.ज. सेल अध्यक्ष अभिजित जगताप,युवक तालुका उपाध्यक्ष अमित फाळके,युवक शहर उपाध्यक्ष अभिलाष शिंदे, श्रेयस कदम उपस्थित होते.