दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । फलटण । दुधेबावी ता.फलटण येथे हाँटेल व ढाबा व्यावसायिक , चहा टपरीवाले यांनी मोठ्या प्रमाणात खुलेआम दारुविक्री सुरू केली असून त्याचा त्रास ग्रामस्थांना होऊ लागला आहे.दारू पिणारे लोक ग्रामस्थांनाही त्रास देऊ लागले असून प्रवाशांनाही त्रास देत असल्याने दुधेबावी ग्रामपंचायत च्या वतीने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दारु बंद करण्याबाबत सोमवारी निवेदन देण्यात आले.
याबाबत याआगोदरही ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला कळवले आहे मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. पोलीस दारुविक्री करणाऱ्या वरती कारवाई का करत नाहीत असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. याचा गैरफायदा घेऊन दारुविक्रेते मोठ्या प्रमाणात दारू विकत आहेत. आता मात्र दारू बंद न झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.