ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी जनमोर्चाच्या वतीने फलटण तहसिलदार यांना निवेदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२१ । फलटण । तमाम ओबीसी समाजाच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांबाबत आज ओबीसी जनमोर्चाच्या वतीने फलटणचे तहसीलदार यांना शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आले.

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना ताबडतोब करण्यात यावी. ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी शासनाची विविध आर्थिक विकास महामंडळे आहेत त्या महामंडळाला भरघोस निधीची तरतूद करण्यात यावी तसेच ओबीसी समाजाचा इंम्पिरिकल डाटा ताबडतोब गोळा करण्यात यावा व स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रमाणे लोकसभा व विधानसभामध्ये २७ टक्के आरक्षण लागू करावे. इत्यादी विविध मागण्यांसाठी आज फलटण तहसील कचेरीवर ओबीसी जनमोर्चाच्या वतीने फलटण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, फलटण तालुका भाजपाचे अध्यक्ष बजरंग गावडे, सातारा जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष दशरथ फुले, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले,फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पोकळे, प्रा. शिवलाल गावडे फलटण तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आमिर शेख, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष ताजुद्दीन बागवान, कोळकीचे माजी सरपंच विष्णुपंत शिंदे, फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अजय कुमार माळवे, नगरसेवक बाळासाहेब मेटकरी, माजी नगरसेवक जाकिरभाई मणेर, भाजपाचे बाळासाहेब ननावरे, वसीम मणेर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सागर कांबळे, नसीर भाई शिकलगार, किरण बोळे, भारतीय जनता पक्षाचे नेते तुकाराम शिंदे, फलटण दर्शनचे संपादक सुधीर अहिवळे, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनिल शिरतोडे, गणेश शिरतोडे, हणमंत शिरनामे, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड,‌ राष्ट्रवादी काँग्रेसचे सिकंदर डांगे, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती किशोर तारळकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कुमठेकर, प्राध्यापक संपतराव शिंदे, युवा नेते बापूराव नाळे, रघुनाथ कुंभार सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर हेंद्रे, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!