स्थैर्य, सातारा, दि. १० : महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना शाखा फलटण यांच्या वतीने फलटण तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे फलटण तालुका अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, सचिव योगेश धेंडे, उपाध्यक्ष संदीप कुंभार, कार्याध्यक्ष सचिन शिरसागर,हणुमंत नागरवाडसह पदाधिकारी उपस्थित होते.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, फलटण तालुक्यात तलाठी रिक्त पदांबाबत सन २0१८ च्या गॅजेट प्रमाणे तलाठी सजे ६० व मंडल अधिकारी पदे रिक्त असून ती अद्याप भरली गेलेली नाहीत. यामध्ये ४५ तलाठी व ८ मंडलाधिकारी कार्यरत असुन एकूण १५ तलाठी व २ मंडलाधिकारी ही पदे रिक्त आहेत. यामुळे इतर कर्मचारी यांचेवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. तसेच सर्वत्र सातबारा संगणीकृत करण्याचे काम सुरू असून ९८ टक्के काम पूर्ण झाले उर्वरित सातबारे संगणीकृत करण्याचे काम सुरू असून लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. परंतु दबावतंत्राचा वापर होत असल्याने तलाठी व संगणक ऑपरेटर यांना त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद आहे यासह तलाठी व मंडलाधिकारी यांना १०, २०,३० वर्षाच्या आस्वासिन प्रगती योजनेअंतर्गत कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी.
तसेच फलटण तालुक्यातील कोरोना केअर सेंटर मधील तलाठी मंडळ अधिकारी यांची नियुक्ती आदेश मागील तीन महिन्यापासून कार्यरत आहेत. जुलै महिन्यातील जमावबंदी व वसुलीचे ग्रामस्तरीय समितीमध्ये सदस्य अध्यक्ष म्हणून पार पडत आहेत. जुलै महिन्यामध्ये नियुक्त्या करु करू नयेत. तसेच अतिरिक्त कार्यभार वेतन मिळावे. निवडणुकीच्या काळातील भत्ता अद्याप देण्यात आला नाही तो देण्यात यावा, संगणकीय डेटा कार्डचे बिल मिळावे. दहा वीस तीस वर्षाच्या मंजूर झालेल्या कालबद्ध पदोन्नतीचे वर्गवारीच्या फरकाची बिले बिले मिळावीत. संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाखे यांच्या निलंबन मागे घेण्यात यावे या निषेधार्थ काळी फित दंडाला बांधून निषेध करण्यात आला. या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना शाखा फलटण यांच्यावतीने तहसीलदार आर. सी. पाटील यांच्याकडे देण्यात आले.