दैनिक स्थैर्य । दि. ०७ फेब्रुवारी २०२३ । सातारा । सातारा जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने दि 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान पॉज मशिन बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे . ऑन लाईन सर्वर चा सतत चा बिघाड ही मूळ तक्रार असल्याचे सांगत संघटना अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले.
आज रोजी सातारा जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटना, सातारा यांच्या वतीने दुकानदारांना येणाऱ्या अडचणी व समस्यांबाबत मा. रुचेश जयवंशी- जिल्हाधिकारी साहेब, मा. जीवन गलांडे- अपर जिल्हाधिकारी साहेब, मा. अमर रसाळ- सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा. मा. दयानंद कोळेकर- निवासी नायब तहसीलदार साहेब, सातारा यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले.
सदरचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांचे नेतृत्वाखाली देण्यात आले. याप्रसंगी सातारा जिल्ह्यातील तालुक्यांचे तालुका अध्यक्ष उपस्थित होते. अजित कासुर्डे- महाबळेश्वर, राजेंद्र भिलारे- जावली, तुकाराम भादुले- खटाव, राजेंद्र भोईटे- कोरेगाव, मधुकर पवार- खंडाळा, आप्पासाहेब तोडकरी- खंडाळा, सातारा तालुका उपाध्यक्ष- बबनराव देवरे, उपाध्यक्ष- संजय रजपूत, सातारा तालुक्यातील इतर पदाधिकारी, रेशन दुकानदार बंधु – भगिनी उपस्थित होते.
ऑन लाईन सर्वरमध्ये बिघाड, दुकानदारांच्या तक्रारीची एनआयसी ने न घेतलेली दखल, त्यामुळे दुकानदार व खातेदार यांच्यात होणारे वादाचे प्रसंग अन्न सुरक्षा योजनेचे एक वर्षाचे प्रलंबित कमिशन दुकानदारांच्या दैनंदिन खर्चाची अडचण इं तक्रारींकडे श्रीकांत शेटे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले . या मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास ७ ते ९ फेब्रुवारी पॉझ मशिन बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.