मराठा व ओबीसी आरक्षणासाठी धनंजय चव्हाण यांचे निवेदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । खटाव । मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने योग्य तो न्यायालयीन पाठपुरावा करुन कायदेशीर आरक्षण लवकरात लवकर मंजूर करावे. ओ.बी.सी. समाजाला राजकीय आरक्षण त्वरीत मिळावे, या प्रमुख मागणीचे निवेदन आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनानंतर खटाव तहसिलदार यांना भाजपा खटाव तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण यांनी दिले.

मराठा समाज आरक्षण कायदेशीर पातळीवर सिद्ध होणेबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यशासनामार्फत योग्य तो न्यायालयीन पाठपुरावा करुन कायदेशीर आरक्षणात लवकरात लवकर मंजूर करावे. तसेच इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याबरोबरच ‘रोहिणी’ आयोगाच्या शिफारशीनुसार न्यायालयीन पाठपुरावा व्हावा व ओ.बी.सी. राजकीय आरक्षण त्वरीत मिळावे. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करुन त्वरीत पदोन्नती मिळावी. या मागण्यांबाबत पुरेपूर विचार होवून ताबडतोप कार्यवाही करावी, असे धनंजय चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!