राज्य उत्पादन विभागाचे जिल्ह्यात छापे, अवैध दारूसह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २५: राज्य उत्पादन शुल्क, साताराच्या भरारी पथकाने पांडे, ता. वाई आणि नायगाव, ता.कोरेगाव येथे छापे टाकून अवैधरित्या दारू विक्रीच्या बाटल्या व दोन कार असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथक सातारा या विभागाने विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर व अधीक्षक अनिल चासकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पांडे, ता. वाई या गावच्या हद्दीत छापे घातले. यावेळी घालून तुषार सुरेश पवार रा. पांडे याच्या ताब्यातून 750 मि.ली. क्षमतेच्या फक्त गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या विदेशी दारुच्या एकूण 47 सिलबंद बाटल्या, 180 मिली क्षमतेच्या विदेशी दारुच्या विविध ब्रँडच्या एकूण 131 सिलबंद बाटल्या व देशी दारू संत्राच्या एकूण 48 सिलबंद बाटल्या व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे नायगांव, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत आरोपी अतुल पोपट धुमाळ रा. नायगांव, ता. कोरेगाव याच्या ताब्यातून 750 मि. ली. क्षमतेच्या फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी दारुच्या एकूण 12 सिलबंद बाटल्या व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आलेले आहे.

दोन्ही ठिकाणी दोन चारचाकी वाहनांसह एकूण 2 लाख 50 हजार 516 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, रोहित माने व संतोष निकम, सचिन खाडे, महेश मोहिते, नितीन जाधव, अजित रसाळ, सागर साबळे, उदय जाधव, किरण जंगम यांनी भाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!