प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे गुरुवारी सातार्‍यात


दैनिक स्थैर्य । 17 मे 2025। सातारा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे हे येत्या गुरुवारी दि. 22 मे रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक सातार्‍यातील राष्ट्रवादी भवनात होणार आहे. या बैठकीत ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना चार्ज करणार आहेत.

सुनील  तटकरे हे 21 मे रोजी कर्‍हाडच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी येणार आहेत. दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. 22) सकाळी नऊ वाजता ते प्रीतिसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करतील. त्यानंतर  विरंगुळा या निवासस्थानाला भेट देणार आहेत. सकाळी दहा वाजता ते सातार्‍याकडे निघतील. अकरा वाजता सातार्‍यातील राष्ट्रवादी भवनात त्यांच्या 10 उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक होईल. बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी दीड ते अडीच वाजेपर्यंत राखीव असेल. दुपारी तीन वाजता ते रायगडकडे रवाना होतील.


Back to top button
Don`t copy text!