अत्याधुनिक अभ्यासिका लवकरच सुरू करणार : दिलीप भोसले; ना. श्रीमंत रामराजेंच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणा निमित्त सुशोभीकरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०१ एप्रिल २०२२ | फलटण | फलटण स्पर्धा परीक्षा व इतर विविध विषयांच्या तयारीसाठी विदयार्थ्याना अदयावत डिजीटल अभ्यासिकेची नितांत आवश्यकता ओळखून श्री सदगुरू प्रतिष्ठान व फलटण नगर परिषदेच्या संयुक्त विदयमाने ना. श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर अत्याधुनिक अभ्यासिका लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री सदगुरू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोसले यांनी दिली

श्री सद्गुरू सहकारी पतसंस्थेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगराध्क्ष दिलीप भोसले बोलत होते.

फलटण शहर व तालूक्यातून महाराष्ट्र राज्य लोकसेवा व केंद्रिय लोकसेवा आयोग आदि विविध स्पर्धामध्ये अनेक विदयार्थी नावलौकिक सिध्द करीत आहेत. आधुनिकतेची कास धरणारे, फलटणच्या संस्कृतीचा वारसा जपणारे ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणा निमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी सुशोभीकरण शुभारंभ करणार आहोत.

या अभ्यासिकेत श्री सदगुरू प्रतिष्ठानच्या वतीने फ्री वाय – फाय, डिजीटल लायब्ररी, डिजीटल क्लासरूम, संगणक कक्ष, करिअर मार्गदर्शन शिबिर, विविध स्पर्धा परिक्षांनुसार तज्ञांचे मार्गदर्शन, अधिकारी वर्गाचे प्रेरणात्मक मार्गदर्शन, वृत्तपत्रे, मासिके, आरामदायी वैठक व्यवस्था आदींसह अदयावत अशी अभ्यासिका उभारणार आहोत, असेही भोसले यांनी स्पष्ट केले.

अभ्यासिकेच्या सर्व बाबींची पूर्तता व व्यवस्थापन प्रतिष्ठानमधुन करणेत येणार आहे. सदरची अभ्यासिका ना नफा ना तोटा या तत्वावर विदयार्थ्याच्या सोयीसाठी चालविणेचा मानस आहे. श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई बहुउद्देशीय हॉलमध्ये ही सुसज्ज व अत्याधुनिका अदयावत डिजिटल अभ्यासिका सुरू करणाम असल्याचेही भोसले यांनी यावेळी सांगीतले.


Back to top button
Don`t copy text!