सचिन चव्हाण यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर


स्थैर्य, बारामती दि.१२ : मुंबईतील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे पुणे जिल्ह्यातून बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेतील सहशिक्षक सचिन भगवान चव्हाण यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे.
अकादमीतर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या व्यक्तींचा गौरव केला जातो. त्यामध्ये यंदा सचिन चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण दि.31 मे 2021 रोजी पुणे येथे होणार आहे.

Back to top button
Don`t copy text!