दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२३ । सातारा । जिल्हा क्रीडा परिषद व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने राज्यस्तर शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभ १८ फेब्रुवारी रोजी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, स्व.पै.खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ ढमाळ, दिलीप पवार, आर.वाय. जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या क्रीडा स्पर्धांचे आयोजन १७ ते १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्रीमंत छत्रपती क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आलेले आहे. क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद मुंबई, पुणे या विभागातून अंदाजे ३०० खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत. खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापक यांची भोजन व निवास व्यवस्था श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा सातारा येथे करण्यात आलेली आहे.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक श्री. युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तर सूत्रसंचालन महेंद्र भोसले यांनी केले.