विद्या प्रतिष्ठानमध्ये राज्यस्तरीय प्रोग्रामिंग स्पर्धा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । बारामती । विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त टेक्नॉस्तोम या प्रोग्रामिंग स्पर्धाचे आयोजन दि. १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धे मध्ये ९०० हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग घेतला होता. या स्पर्धे मध्ये आयआयटी, एनआयटी, सीओईपी या सारख्या नामंकित महाविद्यालयातील अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यामध्ये असणारी प्रोग्रामिंगची कला वृद्धिंगत व्हावी व भविष्यात त्याला चांगल्या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये करियर करण्याची संधी उपलब्ध व्हावी हा होता.

सदर स्पर्धा हि तीन फेऱ्या मध्ये विभागली गेली होती. प्रथम फेरी मध्ये C/C++ या प्रोग्रामिंगची बेसिक प्रश्नावली होती. सुमारे ९०० हून अधिक स्पर्धकांनी त्या मध्ये सहभाग नोंदवला होता. द्वितीयफेरी साठी १०० पात्र विध्यार्थ्यांना संधी मिळाली. सदर फेरी मध्ये C/C++ या प्रोग्रामिंगची एडवान्स प्रश्नावली होती. अंतिम फेरी साठी ३० पात्र विध्यार्थ्यांना संधी मिळाली. सदर फेरी मध्ये C/C++ या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कोडींग करायचे होते.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक प्रतिक गुप्ता (जेएसपीएम, पुणे), द्वितीय पारितोषिक मोहंमदअली शेख (व्हीआयटी, वेल्लोर) व तृतीय पारितोषिक महादेव गोडबोले (ए.जी.पाटील, सोलापूर) यांना प्राप्त झाले. सदर स्पर्धा यशस्वी होण्या साठी विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक भोर व त्याचे सर्व सहकारी, शिक्षक प्रतिनिधी व्यंकटेश रामपूरकर, विभाग प्रमुख डॉ. चैतन्य कुलकर्णी व संगणक विभागातील सर्व प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.

आगामी काळातही महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी रोजगारक्षम बनावेत आणि दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या साठी या सारख्या अधिकाधिक स्पर्धेचे आयोजन भविष्यातही केले जातील, असा मानस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचाकर यांनी व्यक्त केला. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्थ सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अशोक प्रभुणे, सचिव नीलिमा गुजर यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!