१० एप्रिल ला साताऱ्याला रंगणार राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहोळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०६ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा येथे १० एप्रिल २०२२ रोजी मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहोळा आयोजित केला आहे, या सोहळ्याचे उदघाटन ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव उर्फ कवी चंद्रकांत हे करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट हे भूषविणार आहेत हे विशेष होय. उस्मानाबाद येथून ज्येष्ठ लेखक सिद्धेश्वर कोळी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून  स्वागताध्यक्ष म्हणून कवयित्री प्रा नलिनी महाडिक* या भूषविणार आहेत कार्यक्रमाला ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे (नाशिक ) , रेखा दीक्षित ( कोल्हापूर ) , ज्येष्ठ कवी सुरेश लोहार ( कराड )* हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमाला वर्धा येथुन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ गजानन कोटेवार, ग्रंथालय भारती चे पश्चिम प्रांताचे कार्याध्यक्ष विश्वास नेरकर,पुणे येथून ज्येष्ठ लेखक बबन पोतदार, आकाशवाणी विभागाच्या सोनाली बंड, साताऱ्याचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, उद्योजक जीवन जाधव तसेच चित्रपट अभिनेते, निर्माता दिग्दर्शक गणेश शिंदे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशेंन्द्र क्षीरसागर हे करणार असून मुख्य आयोजन सातारच्या मराठी साहित्य मंडळाच्या शहर अध्यक्षा कवयित्री हेमा जाधव यांनी केले आहे. निमंत्रित कवी समवेत नवोदित कविनाही कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे पण त्यांनी सभागृहामध्ये नावे नोंदणी करण्यासाठी सकाळी 9 वाजता वेळेवर उपस्थित रहावे. हा कार्यक्रम जिजामता ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दुसरा मजला, कर्मवीर समाधी परिसर, पोवोई नाका, तालुका, जिल्हा सातारा येथे होणार आहे.
याच कार्यक्रमामध्ये काही मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रामधील ज्या प्रतिभावंत लोकांनी विशेष योगदान दिलेले आहे अशा मान्यवरांना राज्यस्तरीय सवित्रीवाई फुले पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने *पंढरपूर येथील प्रा. सुरेखा भालेराव,बारामती  येथील शुभांगी जाधव काशीकर आणि भारत चव्हाण, बीड येथील प्रा.संजय सावंत, पुणे येथील रश्मी गुजराथी,जयश्री श्रोत्रिय, धुळे येथील अंजली महाजनी, सोलापूर येथील डॉ स्मिता पाटील, मुंबई येथील लता गुठे ,सुनीता चव्हाण,नगर येथील स्वाती झेंडे, नांदेड येथील डॉ घनश्याम पांचाळ सांगली येथील उत्तम बालटे, प्रा शिवाजी वरुडे नाशिक  येथील किरण भावसार , नंदकिशोर ठोंबरे,दशरथ झनकर तसेच सातारा येथून म्हसवड महादेव सरतापे, रोहित आवळे सुनील जाधव नीलम मोहिते, उस्मानाबाद येथील अलका सपकाळ व मीना महामुनी,आदी मान्यवरांचा उल्लेख करता येईल याच कार्यक्रमात *कवयित्री हेमा जाधव यांच्या आई या कविता संग्रहाचे प्रकाशन* मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

Back to top button
Don`t copy text!