वर्धा शहरामध्ये राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । वर्धा । अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेचे राज्य स्तरीय कवी संमेलन आणि राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार सोहळा *जय महाकाली शिक्षण संस्थेच्या अग्निहोत्री कॉलेजच्या सभागृहात* दिमाखात पार पडला.

या कवी संमेलनाचे उ्दघाटन *शिक्षण महर्षी पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री यांनी* दीप प्रज्वलन करून केले तसेच सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करत फोटोला मान्यवरांनी हार फुले वाहून या कार्यक्रमाला सुरवात झाली.

उद्घाटनपर भाषणात श्री अग्निहोत्री सरांनी सत्याच यशोभान करणार ते साहित्य, चित्तशुद्ध आणि व्यवहारिक ज्ञान तसेच जीवनाचं आदर्श सांगणार ते साहित्य. अशा साहित्यिक भाषेने सुरवात करत आपल्या साहित्यिक भाषणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, उर्फ कवी गोलघुमट यांनी भूषविले होते , कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष श्री सिद्धार्थ कुलकर्णी , ज्येष्ठ कवी श्री.सिद्धेश्वर कोळी, पंढरीनाथ कोणे, सामाजिक कार्यकर्ती मा.अर्चनाताई वानखेडे( वर्धा) , डॉ बळवंत भोयर डॉ रजनी दळवी, डॉ निता बोडके आदी मान्यवर उपस्थित होते कवी संमेलनाच्या मुख्य आयोजिका कवयत्री लता हेडाऊ वर्धा शहर अध्यक्ष मराठी साहित्य मंडळ आणि त्यांच्या सह आयोजिका… चैताली केळझरकर , स्वाती बिजवे, छाया भालकर, पंकजा सहस्त्रबुद्धे , यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली तसेच निवेदिका कवयत्री अंजली कांबळे आणि सूत्र संचालिका वैशाली गायकवाड यांनी संचालन करून कार्यक्रमात रंगत आणली. राज्यभरातून आलेल्या तमाम कवी, लेखक साहित्यिक अशा सर्व प्रसिद्ध विभुतींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

समाजासाठी विशेष भरीव कामगिरी केलेल्या श्री. राजू वाघ, श्री कलाम खान आणि डॉ. संध्या पवार यांना श्री शंकर अग्निहोत्री यांनी महाकाली शिक्षण संस्थेतर्फे रु.११,०००/ च्या धनराशी स्वरूपात पुरस्कार दिला जाईल तसेच अन्य पुरस्कार विजेत्यांना रु १,१००/च्या धनराशी स्वरूपात पुरस्कार दिला जाईल असे घोषित केले. आणि उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला एकंदरीतच संपुर्ण सोहळ्याने प्रभावित होऊन श्री अग्निहोत्री सरांनी मराठी साहित्य मंडळास यापुढेही त्यांचा भव्य हॉल पुढेही राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले.

मराठी साहित्य मंडळाच्या वतीने श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांनी समाजातून सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करुन पुरस्कार देण्याची अमलात आणलेली संकल्पना श्री अग्निहोत्री सरांना खूप आवडली असे त्यांनी विशेष नमूद केले.

कार्यक्रम अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांच्या समारोपिय काव्यपर भाषणाने या भव्यदिव्य सोहळ्याची सांगता झाली.


Back to top button
Don`t copy text!