दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । राज्यातील उपेक्षीत मागास वर्गीयांना राजकीय, सामाजिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात न्याय मिळावा या करिता शुक्रवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालय जवळ, मुंबई येथे राज्यव्यापी परिषद राज्याचे बहुजन कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेटटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्य ओबीसी बहुजन नेते कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. उपेक्षितांसाठी संघर्ष करणारे ओबीसी वर्गातील नेते यावेळी राज्य भरातून उपस्थित राहणार आहेत.
या राज्यस्तरीय परिषदेस ओबीसी वर्गातील बारा बलुतेदार, अलुतेदार भटके विमुक्त (एनटी, डीएनटी, वीजे), एसबीसी, मुस्लिम ओबीसी, एसटी (आदिवासी), एससी या उपेक्षित जात समूहाच्या संवैधानिक अधिकारांच्या बाजू या परिषदेत मांडण्यात येणार आहेत. याप्रसंगी राज्यभरातून सर्व ओबीसी वर्गातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या परिषदेच्या अनुषंगानेच राज्याचे ओबीसी व बहुजन समाजाचे नेते कल्याणराव दळे, शिवसेना व ओबीसींचे नेते संजय विभुते, दत्तात्रय चेचर, अरुण खरमाटे, प्रतापराव गुरव, पांडुरंग भवर, सातारचे माजी उपनगराध्यक्ष भाऊ दळवी, प. महाराष्ट्र अध्यक्ष शंकरराव मर्दाने, बारा बलुतेदार महासंघ सातारा जिल्हाध्यक्ष सुरेशराव पवार, ओबीसी सातारा जिल्हाध्यक्ष भरत लोकरे सर, तसेच इतर मान्यवर मंडळींनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन जनजागृती करुन या परिषदेस उपस्थित रहावे या करीता राज्याचा दौरा केला आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ प. विभागीय अध्यक्ष शंकरराव (तात्या) मर्दाने यांच्याशी खालील क्रमांकावर संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे. 9423265432 /8421825975.