आज साताऱ्यात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

दैनिक स्थैर्य | दि. 15 डिसेंबर 2024 | सातारा | येथील श्री- टू- वन चेस अकादमी यांच्या वतीने जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आज रविवारी (ता. १५) राज्यस्तरीय खुल्या जलदगती एक दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर सांस्कृतिक सभागृहात आयोजन केले आहे.

स्पर्धेचे सलग १९ वे आयोजन आहे. या स्पर्धेत एकूण ४७ बक्षिसे आहेत. यामध्ये रोख रकमेसह १८. सन्मानचिन्ह व २१ पदकांसह पाच हजार २०० रुपयांची बक्षिसे ठेवल्याची माहिती संयोजकांनी दिली.

ही स्पर्धा चार वेगवेगळ्या गटांत घेण्यात येईल. यात खुला गट, अंगणवाडी ते इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी ते सहावी, इयत्ता सातवी ते नववी असे गट आहेत. प्रत्येक गटातील सामने साखळी पद्धतीने खेळवले जातील. स्पर्धेतील खुल्या वयोगटाला वयोमयदिची अट नाही.

कोणत्याही वयाचा ज्याला बुद्धिबळ खेळता येते, असा कोणताही खेळाडू यात सहभाग शकेल. स्पर्धेतील खुल्या गटासाठी प्रथम क्रमांकास रुपये एक हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास रुपये ७०० व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रुपये ५०० व सन्मानचिन्ह, चतुर्थ ते दहाव्या क्रमांकापर्यंत रुपये ३०० व सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे.

या बरोबरच सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ (६० वयोगट) खेळाडू, महिला खेळाडू, बिगर मानांकित खेळाडूस रोख रक्कम ३०० रुपये व सन्मानचिन्ह तसेच अन्य गटातील यशस्वितांना सन्मानचिन्ह व पदक असे बक्षीस देण्यात येईल.

प्रत्येक शालेय गटात खास बक्षीस सर्वोत्कृष्ट युवती बुद्धिबळ खेळाडूसाठी आकर्षक सन्मानचिन्ह अशी एकूण ४७ बक्षिसे रोख रकमेसह १८ आकर्षक सन्मानचिन्ह व २१ पदकांसह पाच हजार २०० रुपयांची बक्षिसे आहेत. आतापर्यंत राज्यातील ५० खेळाडूंनी त्यांचा सहभाग नोंदविला आहे.


Back to top button
Don`t copy text!