
दैनिक स्थैर्य । 12 मार्च 2025 । पुणे । औरंगाबाद येथील डोंगरदिवे (मंगलपुष्प ग्रुप) वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने 23 मार्च रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक इमारत पिंपरी, नेहरुनगर रोड, पिंपरी (पुणे) येथे तर 30 मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का, रेल्वेस्टेशन पुणे येथे राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा संस्थापक अध्यक्ष कांतिलाल डोंगरदिवे यांनी आयोजित केला असून यावेळी अमृता गायकवाड, गोकुळदास शेजवळ, प्रेमनाथ पंडित, के. के. जाधव हे मेळाव्याचे संयोजन करणार आहेत. यावेळी डॉ. कविता अंभारे व पंजाबराव मनवर हे सूत्रसंचालन करणार आहेत.
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी 98819507554, 84211102452, 9850083547, 9923667941 या मोबाईवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.