दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२५ | फलटण |
राज्यस्तरीय ऑडिटर कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचे राज्यस्तरीय अधिवेशन प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी नाशिक येथे होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा अध्यक्ष विवेक गायकवाड यांनी दिली.
यावेळी बोलताना विवेक गायकवाड यांनी सांगितले की, हे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२५ रोजी राज्यस्तरीय ऑडिटर कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचे राज्यस्तरीय अधिवेशन प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी म्हणजेच नाशिक येथे होणार आहे.
या राज्यस्तरीय अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. सातारा जिल्ह्यातील सर्व सदस्यांनी आपली नावे नोंदवून हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ऑडिटर कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य श्री. दत्तात्रय पवार सहसचिव, श्री. संजय घोलप विश्वस्त, श्री. श्रीकांत चौगुले विश्वस्त, श्री. संपत शिंदे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष, श्री. विवेक गायकवाड सातारा जिल्हाध्यक्ष व सर्व कमिटी मेंबर यांनी आवाहन केले आहे.